हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
जसपूर (उत्तराखंड) : चीनी मंडी
जयपूर येथील नादेही साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना गेल्या ११ महिन्यांपासून पगारच मिळालेला नाही. त्यामुळे कर्माचाऱ्यांची स्थिती बिकट झाली आहे. कारखान्याच्या प्रशासनाने दिलेल्या खोट्या आश्वासनांचा कंटाळा आला असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. वैतागलेल्या कर्मचाऱ्यांनी कामावर बहिष्कार टाकून आंदोलन केले. कारखान्याच्या सरव्यवस्थापनांशी चर्चेची मागणी कर्मचाऱ्यांनी कायम ठेवत संतप्त कर्मचाऱ्यांनी सरव्यवस्थापकांना घेराव घातला.
गेल्या अकरा महिन्यांपासून या कष्टकऱ्यांना पगार मिळालेला नाही. कारखान्याकडे अनेक कर्मचारी हंगामी म्हणून कार्यरत आहेत. पगार मिळाला नसल्याने कामगारांची आर्थिक स्थिती कोंडी झाली आहे. दररोजच्या जगण्यासाठीही कामगारांना झगडावे लागत आहे. कारखान्याच्या प्रशासनाकडे कर्मचाऱ्यांनी अनेकवेळा आपल्या मागण्या मांडल्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
पगार न मिळाल्याने संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी कामावर बहिष्कार घालून कारखान्याच्या सरव्यवस्थापकांना घेराओ घातला. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित राहिलेले वेतन देण्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली. वाढता गोंधळ पाहून कारखाना प्रशासनाने पोलिसांना बोलावले. गोंधळाची माहिती मिळाल्यावर स्थानिक लोकप्रतिनिधी आदेश चौहान हेही घटनास्थळी आले. कारखाना प्रशासन आणि कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीनंतर एक महिन्यात पगार देण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर बहिष्कार मागे घेण्यात आला.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp