देवबंद (सहारनपुर) : चार दिवसापासून 16800 रुपये बोनस मिळालाच पाहिजे, या मागणीसाठी येथील साखर कारखान्यातील कर्मचार्यांचे धरणे आंदोलन सुरु आहे. आज चौथ्या दिवशीही ते आपल्या मागणीवर कायम राहिले आहेत. याबाबत एसडीएम राकेश कुमार सिंह यांनी मध्यस्थी केली पण त्याचा काही उपयोग झाला नाही. धरणे आंदोलन करणार्या कर्मचार्यांनी सांगितले की, 2018-19 मध्ये सरकारने कच्च्या साखरेच्या उत्पादनासाठी प्रति क्विंटल एक हजार रुपयाचे अनुदान कारखान्याला दिले. ज्यामध्ये कारखान्याने 5 लाख 73 हजार क्विंटल कच्च्या साखरेचे उत्पादन केले. यातून कारखान्याने 58 करोड रुपये अनुदान सरकारकडून घेतले.
यामुळे कारखान्याने आपल्या ग्रुपच्या बॅलेंन्स शीटवर फायदा दाखवला आहे. ते म्हणाले की, त्रिवेणी ग्रुपच्या सातपैकी पाच कारखान्यांना 20 टक्के म्हणजेच 16800 या हिशेबाप्रमाणे बोनस दिला, पण देवबंद यूनिट च्या प्रबंधतंत्राने मात्र 8.33 टक्क्याप्रमाणे बोनस देण्याचा प्रयत्न केला. असा भेदभाव कर्मचारी खपवून घेणार नाहीत. यावेळी भारतीय कामगार संघटनेचे महामंत्री मदन सिंह, कर्मचारी यूनियन चे महामंत्री प्रमोद शाही, विरेंद्र सिंह, प्रतीश शर्मा, सुरेंद्र पाल, बलदेव राज, बीर सिह, संजय त्यागी, राम प्रसाद, सुशील सिंह, सूरज, मोहम्मद हसीन, विजय टंडन, रविंद्र फौजी, नेपाल सिंह आदी उपस्थित होते. साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दीनानाथ मिश्र म्हणाले, 2018-19 ची बैलेंन्स शीट च्या हिशेबानुसार बोनस दिला जात आहे. कसलाही भेदभाव केलेला नाही.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.