कोल्हापूर, ता. 31: उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे -पाटील, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक दिग्गज साखर सम्राटानी मंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे, साखर उद्योगासमोर असणाऱ्या अनेक समस्या दूर करण्यास मदत होणार आहे. ऊस उत्पादक व साखर उद्योगला ही मंत्रिमंडळाकडून अपेक्षा वाढल्या आहेत.
राज्यात साखर उत्पादन क्षेत्रात असणाऱ्या दिग्गज मंत्र्यांकडून साखरेला चांगला दर मिळावा, इथेनॉल सह इतर उपपदार्थांनाही चांगला दर मिळावा, यासाठी हे मंत्रिमंडळ प्रयत्नशील राहून उसासह साखर उद्योगालाही चालना देण्यास पुढाकार घेतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यावर्षीच्या गळीत हंगामामध्ये उसाला जाहीर झालेला दर आणि प्रत्यक्ष साखरेतून मिळणारा दर यामध्ये अडीचशे ते तीनशे रुपयांची तफावत आहे. यामुळे साखर कारखान्यांना याचा मोठा फटका बसत आहे. साखर कारखान्यांची दुरावस्था दूर करण्यासाठी हेच दिग्गज मंत्रिमंडळ प्रयत्न करेल. आणि त्यांनी ते प्रयत्न करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशीही मागणी होत आहे.
मंत्रिमंडळातील दिग्गज साखर सम्राट
पुणे : अजित पवार, दिलीप वळसे-पाटील
कोल्हापूर : हसन मुश्रीफ, सतेज पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर.
सांगली : जयंत पाटील, विश्वजित कदम
सातारा : बाळासाहेब पाटील, शंभूराजे देसाई
अहमदनगर : बाळासाहेब थोरात, शंकरराव गडाख, प्राजक्त तनपुरे
नांदेड : अशोक चव्हाण
जालना : राजेश टोपे
लातूर : अमित देशमुख
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.