महाराष्ट्रात साखर कारखान्यांना नुकसान भरपाई मिळण्याची आशा

पुणे : महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महा विकास आघाडीच्या नव्या आलेल्या सरकार बरोबरच, राज्यात साखर उद्योग अतिवृष्टी आणि पुरामुळे साखर उत्पादनात घट झाल्यामुळे शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी करण्याच्या तयारीत आहे. पुरामुळे ऊसाच्या शेतीचा मोठा भाग १५ ते २० दिवसापर्यंत पाण्यात होता, ज्यामुळे ऊसाच्या पिकाची गुणवत्ता आणि रिकव्हरी दोन्हीचेही नुकसान झाले आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील ऊस पिकाचे पुरामुळे नुकसान झाले, याचा परिणाम २०१९-२० च्या गाळप हंगामावर दिसून येत आहे. साखरेच्या किमतीतील दबाव आणि निर्यातीतील घसरणीमुळे शेतकऱ्यांची थकबाकी भागवण्यात कारखान्यांना अडचणी येण्याची संभावना आहे. यामुळे राज्यातील सर्वच साखर कारखाने सरकारकडून मदतीची अपेक्षा करत आहेत. कारखानदारांच्या म्हणण्यानुसार, प्रति टन ऊसातील साखरेचे प्रमाण, ज्याला साखरेची रिकव्हरी म्हणून ओळखले जाते, ती काही प्रमाणात कमी होईल. कोल्हापूरातील साखर विशेषज्ञ पी.जी. मेढे यांनी सांगितले की, सरकारने साखरेच्या घटलेल्या रिकव्हरी ची भरपाई करावी.

कारखानदारांनी सांगितले की, यावर्षी साखरेची रिकव्हरी कमी असूनही, कारखाने गेल्या वर्षाच्या रिकव्हरीच्या आधारावर शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे देतात. मेढे यांनी सांगितले की, गेल्या वर्षाची रिकव्हरी अधिक होती, म्हणून कारखाने या वर्षी कमी रिकव्हरी साठी अधिक किंमत देतील.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here