साखर कारखानदारांनी उसाचा दुसरा हप्ता ५०० रुपये द्यावा: आंदोलन अंकुश

कोल्हापूर : सध्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे दर वाढले असून मागणीही चांगली आहे. त्यामुळे कारखान्यांना आर्थिक फायदा होत आहे. त्यामुळे या तेजीचा लाभ ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होण्यासाठी कारखान्यांनी उसाचा दुसरा हप्ता ५०० रुपयांप्रमाणे द्यावा, अशी मागणी आंदोलन अंकुशतर्फे करण्यात आली आहे. याबाबत १५ दिवसात सकारात्मक निर्णय न झाल्यास साखर कारखान्यांसमोर आंदोलन करण्याचा इशारा आंदोलन अंकुशचे धनाजी चूडमुंगे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. साखरेच्या दराबरोबरच मळी, मोलासिस आणि अन्य उपपदार्थ यांच्या निर्मितीतून मोठा नफा कमवत आहेत, असेही ते म्हणाले. यावेळी पोपट राणे, धनाजी माने आदी उपस्थित होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here