पुणे : महाराष्ट्रतील साखर कारखाने आणि डिस्टिलरीज यांनी सरकारी रुग्णालयांसाठी हँड सॅनिटायजर बनवण्याचा विडा उचलला आहे. राज्याचे साखर आयुक्त सौरभ राव म्हणाले की, गेल्या चार दिवसांमध्ये रोज ३ लाख लीटर पेक्षा अधिक सॅनिटायजर चे उत्पादन सुरु केले आहे. राव म्हणाले की, राष्ट्रीय स्वास्थ्य मिशनचे निदेशक अनुप कुमार यादव देशभरामध्ये पुरवठा शृंखले चा समन्वय करत आहेत. सरकारी रुग्णालयातील मागणी पूर्ण झाल्यानंतर खाजगी विक्रीला परवानगी दिली जाईल.
कोरोना वायरस च्या पार्श्ववभूमीवर, सॅनिटायजरची मागणी वाढली आहे. यामुळे बाजारात सॅनिटायजर कमी प्रमाणात दिसून येत आहे. यामुळे केंद्र सरकारने सूचना दिल्या होत्या की, सहकारी साखर कारखान्याद्वारा संचालित डिस्टिलरीज यांनी हैंड सॅनिटायजर चे उत्पादन सुरु करावे. डिस्टिलरीज द्वारा उत्पादित सॅनिटायजर चा पुरवठा मेडिकल कॉलेज आणि सरकारी रुग्णालयांना केला जाईल. ग्राहक मंत्रालय, खाद्य आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय द्वारा 19 मार्चला एक परिपत्रक काढण्यात आले होते, ज्यामध्ये राज्य सरकारला साखर उद्योगांना हँड सॅनिटायजर चे उत्पादन करण्याची परवानगी देण्याची सूचना दिली होती.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.