ऋषिकेश : डोईवाला साखर कारखान्याने लवकर ऊस गाळप सुरू करण्याची तयारी केली आहे. कारखान्यात यावर्षीच्या गाळपासाठी देखभाल, दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. रविवारी येथे गळीत हंगामासाठी पूजा-अर्चा करून बॉयलर अग्नी प्रदीपन करण्यात आले.
लाइव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, डोईवाला साखर कारखान्यात गळीत हंगाम २०२२-२३ साठी कारखान्याचे कार्यकारी संचालक दिनेश प्रताप सिंह यांनी पूजा-अर्चा केली. त्यांनी सांगितले की, वीज उत्पादन व्हावे आणि टर्बाइन चालावे यासाठी गळीत हंगामापूर्वी बॉयलर अग्नि प्रदीपन केले जाते. लवकरच कारखान्यात गळीतास सुरुवात होईल. शेतकऱ्यांना ऊस तोडणीबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. मुख्य अभियंता राकेश कुमार शर्मा, उप मुख्य रसायन शास्त्रज्ञ अनिल कुमार पाल, सर्वजीत सिंह, आशुतोष अग्निहोत्री, अक्षय कुमार सिंह, सुशील कुमार कुशवाह, दीप प्रकाश कुशवाह, उदयकान्त मिश्रा आदी उपस्थित होते.