नवी दिल्ली : साखर कारखान्यांना २०२२ च्या हंगामात महसूल आणि नफा या दोन्ही घटकांमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा क्रिसिल ट्रॅकरने (CRISIL tracker) व्यक्त केली आहे. यंदाच्या हंगामात साखरेच्या दरात १६-१७ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या वेळी दरात किरकोळ घसरण झाली होती. साखरेच्या दराती वाढीमुळे औद्योगिक मागणीतील तेजी आणि निर्यातीत वाढ झाली आहे. स्थिर उत्पादनादरम्यान, खपात वाढ झाल्यामुळे साठा कामी होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
यावर्षी साखर निर्यात जवळपास ५० लाख टन होण्याची शक्यता आहे. यावेळी कोणतेही सरकारी अनुदान नसताना आंतरराष्ट्रीय दरात १५-१६ टक्के वाढीमुळे निर्यात चांगली होण्याची अपेक्षा आहे. चांगल्या विक्रीमुळे महसुलात १८-१९ टक्क्यांची वाढ होणे शक्य आहे. दुसरीकडे साखर कारखान्यांना डिस्टीलरी सेगमेंटमधून चांगला महसूल मिळण्याची शक्यता आहे. कारण इथेनॉलच्या दरातही ४-६ टक्के वाढ झाली आहे. तेल वितरण कंपन्यांकडून मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. यामुळे साखर कारखान्यांना या हंगामात वेळेवर ऊस बिले देण्यास मदत होईल.