एफआरपी जमा करण्यासाठी साखर कारखान्यांना पंधरा दिवसांची मुदत

 

बातम्या वाचू नका ऐकाही, बातम्या वाचणे झाले एकदम सोपे ,आत्ता बातम्या वाचणे आणि ऐकणे झाले एकत्रच

कोल्हापूर : चीनी मंडी

ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपी थकविलेल्या साखर कारखान्यांवर सरकारने कारवाईचा बडगा उगारला आहे. कोल्हापूर विभागातही मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू आहे. तहसीलदारांनी बारा साखर कारखान्यांना जप्तीची नोटिस पाठवली आहे. येत्या पंधरा दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यांवर एफआरपी जमा केली नाही तर, कारखान्यांवर जप्तीची नामुष्की ओढवणार आहे.

पुण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या हल्लाबोल आंदोलनाची दखल घेऊन साखर आयुक्तांनी एफआरपी थकविलेल्या कारखान्यांची साखर आणि इतर जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने थकीत एफआरपी वसूल करण्यासाठी १२ कारखान्यांच्या साखर आणि जंगम मालमत्ता जप्त करण्याचा आदेश दिला. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने तहसीलदारांना कारवाईचे आदेश दिले.

कारवाईचा पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील दत्त शिरोळ, गुरुदत्त शुगर्स, संताजी घोरपडे, पंचगंगा, इको केन, वारणा, जवाहर कारखान्यांना नोटिस देण्यात आली आहे. त्या नोटिसमुळे हादरलेल्या काही कारखान्यांनी प्रतिटन २३०० रुपयांप्रमाणे अडव्हान्स जमा केला. पण शिल्लक एफआरपीची रक्कम भरली नसल्याने कारखान्यांची साखर जप्त केली जाणार आहे. त्यासाठी पंधरा दिवसांची मुदत दिली असल्याने १६ फेब्रुवारीपर्यंत कारखान्यांना एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी लागणारच आहे. अन्यथा कारखान्यांची साखर जप्त करून त्यांतून शेतकऱ्यांचे पैसे भागवले जाणार आहेत.

डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप:  http://bit.ly/ChiniMandiApp  

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here