हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
कोल्हापूर, ता. 3 : राज्यातील साखर कारखान्यांनी 30 मे पर्यंत थकीत एफआरपी द्यावी, अन्यथा एक जूनपासून आरआरसी अंतर्गत कारवाई करुन शेतक-यांची थकीत बिले अदा करण्याचा इशारा साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिला आहे.
कारवाईच्या धसक्याने जिल्ह्यातील नऊ कारखान्यांनी पूर्ण एफआरपी दिली असली तरी अद्याप पंधरा टक्के व्याजाच्या रक्कम दिलेली नाही. अंकुश, जय शिवराय किसान मोर्चा आणि बळीराजा संघटनेच्यावतीने एफआरपी व त्यावरील व्याजाच्या मागणीसाठी पुणे येथे साखर आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना मागणीचे निवेदन दिले.