साखर कारखान्यांवर कठोर कारवाईचे संकेत

मुजफ्फरनगर: ऊस शेतकरी प्रलंबित थकबाकीमुळे खूपच चिंतेत आहेत. त्यांना शांत करण्यासाठी सरकार विविध प्रयत्न करीत आहे. 23 जुलै रोजी जिल्हाधिकारी सेल्वा कुमारी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मुजफ्फरनगरमधील उस शेतकर्यांशी संपर्क साधून लवकरच थकबाकी भागाविनेसाठी प्रयत्नशील आहोत अशी ग्वाही दिली. जिल्हा प्राधिकरणांनी थकबाकी भागाविणेसाठी साखर कारखान्यांना 31 ऑगस्टची मुदत दिली आहे आणि थकबाकी चुकती न झाल्यास कठोर कारवाईचीही चेतावणी दिली आहे.

केंद्र सरकारने साखर हंगामासाठी उसाची एफआरपी प्रतिटन २७५० रुपये कायम ठेवला आहे. या निर्णयावर ऊस उत्पादक शेतकरी नाखूष आहेत.

सध्याच्या अहवालानुसार चालू हंगामात भारतात साखर कारखान्यांकडे तब्बल 15,222 करोड रुपये देय आहेत. उस देय न भरल्यास, विविध राज्यातील शेतकऱ्यांनी असंतोष व्यक्त केला आहे आणि तसेच सरकारवरही देय भागाविनणेबाबत दबाव आणला आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here