बांग्लादेशामध्ये साखर उद्योग संकटाच्या मार्गावरुन जात आहे. राज्यसरकारचे कारखाने कर्जाचे ओझे आणि साखर न विकली गेल्याने चिंतेत आहेत. पंतप्रधान कार्यालयाने 15 सरकारी मालकीच्या साखर कारखान्याच्या व्यवस्थापनातील त्रुटी काय आहेत हे शोधून काढण्यासाठी एका समितीची स्थापना केली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार बांग्लादेंशामध्ये साखर उत्पादन मूल्य बाजार भावाच्या जवळपास दुप्पट आहे, ज्यामुळे अधिकृत डीलर साखर कारखान्यातून साखर खेरदी करत नाहीत आणि कारखान्यामध्ये साखरेच्या स्टॉकमध्ये वाढ होत आहे. साखर कारखाना ऊस शेतकरी महासंघाचे महासचिव शाहजहां बादशाह यांनी सांगितले की, कारखान्यांकडून ऊस शेतकर्यांची टीके 300 मिलियन पेक्षा अधिक थकबाकी आहे. अनियमिततेमुळे साखर कारखाने अडचणीत आहेत, पण याचा परिणाम ऊस शेतकर्यांना भोगावा लागत आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.