बेळगाव: चीनी मंडी
कोरोना वायरसमुळे देशभरामध्ये उद्योगांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. यामुळे साखर उद्योगावरही मोठा परिणाम झाला आहे. याबरोबरच ऊस शेतकर्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांची अथिंक स्थिती चांगली नाही. कारण त्यांचे पैसे कारखान्यांनी आजपर्यंत भागवलेले नाहीत. बेळगाव जिल्ह्यात साखर कारखान्यांकडून जवळपास 496 करोड रुपये बाकी आहेत. मुख्यमंत्री बी.एस. येडीवुरप्पा यांनी निर्देश देवूनही कारखानदारांनी पैसे देण्यात उशिर केला आहे. ऊसाचे पैसे भागवण्यात उशिर केल्यामुळे शेतकरी निराश झाले आहेत. कारण लॉकडाउन शेतकर्यांच्या संकटाला अधिक गंभीर करु शकतो.
साखरेशी संबंधीत कायद्यांनुसार, कारखान्यांना ऊस गाळप केल्यानंतर 14 दिवसांच्या आत ऊस उत्पादकांना पैसे देणे अनिवार्य आहे. तरी दुसरीकडे साखर कारखानेही अर्थिक तंगीशी लढत आहेत. साखरेची विक्री न झाल्यामुळे ते आर्थिक संकटात असल्याचे कारखानदारांनी सांगितले. बेळगावमध्ये अधिकांश शेतकरी ऊस पीक घेतात, आणि जिल्ह्यात 26 साखर कारखाने आहेत. 19 कारखान्यांकडून 496 करोड रुपये देय आहेत. राज्य ऊस विकास आणि साखर निदेशालयाचे आयुक्त यांच्याकडून जाहीर करण्यात आलेल्या आकड्यांनुसार, 1,10,23,688 टन ऊस गाळपासाठी कारखान्यांना विकण्यात आले.
Audio Playerहि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.