भारत अतिरिक्त साखरेमुळे अनेक समस्यांशी झगडत आहे. यामुळे साखर निर्यातीला गती देण्याचा सरकारचा उद्देश आहे. या पार्श्वभूमीवर 28 ऑगस्टला 2019-2020 या हंगामासाठी 60 लाख टन साखर निर्यातीवर अर्थिक मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. ही साखर निर्याती दिवाळीनंतर सुरु होईल, असा अंदाज होता, पण महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी साखर निर्यातीला सुरुवात केली आहे.
साखर उद्योगाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी काल निर्यातीला प्रारंभ केला आहे. एशियाई आणि अफ्रीकी देशातून साखरेची अधिक मागणी आहे. कारखान्यांद्वारा 20,000 मेट्रीक टनाची निर्यात श्रीलंका, यमन आणि सोमालिया मध्ये झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एक्स फॅक्टरी दर 20,600 ते 20,800 रुपयेे प्रति टन होता.
साखर कारखाने व्याजाच्या ओझ्यामुळे त्रस्त आहेत, म्हणूनच साखरेचा अतिरिक्त साठा कमी करण्यासाठी आणि गोदामात जागा बनवण्यासाठी 2018-2019 या चालू हंगामाचा माल निर्यात होऊ लागला आहे..
MAEQ कोटयातील किमान 50 टक्के माल निर्यात करण्यासाठी साखर कारखान्यांनी कंबर कसली आहे, कारण यामुळे सरकारकडून अनुदान मिळण्यात मदत होईल. कारखान्यांना अनुदान मिळवण्यासाठी MAEQ कोट्यातील किमान 50 टक्के माल निर्यात करणे गरजेचे आहे. तरच त्यांना 10,448 रुपये प्रति मेट्रीक टनाच्या हिशेबाने अर्थिक मदत मिळेल.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.