हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
चेन्नई : तामिळनाडूतील साखर कारखान्यांना रहदारीचा अडथळा, उसाचा तुटवडा, ईआयडी इंडियन पॅरी लि. या साखर उद्योगाशी संबंधित असणार्या कंपनीने तामिळनाडूतील दोन कारखान्यांवर विशेष भर दिला आणि पाँडेचरी येथील कारखाना उसाच्या अनुपलब्धतेमुळे जवळपास बंद पडला आहे, अशी माहिती मुरुगप्पा ग्रुपचे एक्झीक्युटीव्ह अध्यक्ष एम.एम. मुरुगप्पन यांनी दिली. कंपनीच्या वेबसाईटवरील मतानुसार मुरुगप्पा ग्रुपचा ईआयडी पॅरी वर 44.89 टक्के हक्क आहे.
ईआयडी पॅरी ही दक्षिणेतील एकच मिल तोट्यात नाही, तर थिरु अरुरन शुगर्स लि. या कंपनीचेही उत्पादन उसाच्या तुटवड्यामुळे कमी झाले आहे. यामुळे कारखाने बँकांच्या कर्जामध्ये बुडाले असल्याचे कंपनीच्या वार्षिक अहवालात सांगण्यात आले आहे. साक्थी शुगर लि. ही आणखी एक प्रमुख साखर उत्पादक कंपनीही गेल्या दोन वर्षापासून या अर्थिक अडचणींना तोंड देत आहे. जगातील लोकसंख्येचा विचार करता भारत सहाव्या क्रमांकावर आहे, पण पृथ्वीवर केवळ 4 टक्केच ताजं पाणी उपलब्ध आहे. पाणी रिसोर्सेस ग्रुप च्या
मतानुसार 2030 पर्यंत पाण्याची मागणी 50 टक्क्यापर्यंत वाढेल. गेल्या तीन दशकांपासून चेन्नई येथील ह्युंडाई मोटर कं. आणि फोर्ड मोटर कंपनी पाण्याचा तुटवडा सहन करत आहेत. 2018 मध्ये झालेल्या अत्यंत कमी पावसामुळे या गोष्टी घ़डत आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार भारतात मान्सूनची कमतरता आहे आणि संपूर्ण देश ही तूट भरुन काढण्यासाठी मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत आहे. शहरतील हवामान खात्याच्या अंदाजानुसार तामिळनाडूत जूनमध्ये 38 टक्के पाउस कमी झाला आहे. तामिळनाडूतील दक्षिण भारतीय साखर कारखानदार असोसिएशनचे अध्यक्ष पलानी जी. पेरीस्मय म्हणाले, ही स्थिती अशीच राहिली तर मान्सून अपयशी ठरण्याची चिन्हे दिसतात. या स्थितीत तगून राहण्याची 30 टक्के तयारी आमची आहे, पण कारखन्यांची स्थिती तशी नाही. बरेच कारखाने बंदही झाले आहेत.