देशभरातील साखर कारखान्यांंकडून सुमारे १५, ८५० कोटी रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देणे बाकी असल्याचे अन्न आणि ग्राहक व्यवहार राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्यसभेत सांगितले. ९,७९२ कोटी रुपयांच्या देय रकमेसह, उत्तर प्रदेशमधील मिल्स या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत, तर महाराष्ट्रात ऊस शेतकऱ्यांना १,२३१ कोटी रूपयांचे देणे बाकी आहे, असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले.
मागील हंगामातील साखरेच्या अतिरिक्त उत्पादनामुळे साखर कारखान्यांवरील चलनवाढीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. साखर उद्योगातील चलनवाढ सुधारण्यासाठी सॉफ्ट लोन तसेच 3 मिलियन टन साखरेच्या बफर स्टॉक ठेवण्यासाठी लागणाऱ्या खर्चाच्या रक्कमेची तरतूद आणि व्याजदर परतफेड करण्याच्या भरपाईसह सरकारने अनेक गोष्टींच्या कालमर्यादा वाढवल्या आहेत, जेणेकरून साखर उद्योगाला सुधारता येईल.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.