अमरोहा : साखर कारखान्यांचा गाळप हंगाम समाप्त झाला आहे. मात्र, अद्याप जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे २२० कोटी रुपये कारखान्यांकडे थकीत आहेत. कोरोना कर्फ्यूमुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. शेतकरी संघटनांनी लवकर उसाचे थकीत पैसे देण्याची मागणी केली आहे.
जिल्ह्यातील सव्वा लाखांहून अधिक शेतकरी आहेत. जिल्ह्यात तीन साखर कारखाने आहेत. त्यांचा गाळप हंगाम समाप्त झाला आहे. मत्र, शेतकऱ्यांना सर्व ऊस बिले मिळालेली नाहीत. साखर कारखान्यांनी ७५ टक्के ऊस बिले दिली आहेत. शेतकऱ्यांचे २५ टक्के पैसे थकीत आहेत. जिल्ह्यातील तिन्ही साखर कारखान्यांकडे २२० कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे सांगितले जात आहे. मंडी धनोरा साखर कारखान्याने ६७ टक्के पैसे दिले आहेत. तर चंदनपूर कारखान्याने ९४ आणि गजरौला साखर कारखान्याने ५१ टक्के ऊस बिले दिली आहेत.
कोरोना कर्फ्यूमुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. भारतीय किसान युनीयनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेंद्र सिंह चौधरी यांनी कारखान्यांकडून लवकर पैसे मिळावेत यासाठी प्रयत्न केले. डीसीओ हेमेंद्र प्रताप सिंह यांनी लवकर ऊस बिले दिली जातील असे सांगितले. साखर कारखान्यांना किती दिवसात पैसे देणार याचा अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे.