शामली : जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे चालू गळीत हंगामातील ८४१ कोटी ११ लाख रुपयांची थकबाकी आहे. शेतकऱ्यांना पैसे देण्यापूर्वीच कारखाने बंद होण्यास सुरुवात झाली आहे. शामली वगळता जिल्ह्यातील थानाभवन आणि ऊन साखर कारखाना बंद झाला आहे.
जिल्ह्यात थानाभवनच्या तीन आणि ऊन साखर कारखान्याचा गळीत हंगाम चार मे रोजी समाप्त झाला. शामली कारखान्याची हंगाम समाप्ती १६ मे रोजी होण्याची शक्यता आहे. शामली, ऊन, थानाभवन कारखान्याने २०२०-२१ या गळीत हंगामात तीन कोटी ५२ लाख ४४ हजार क्विंटल ऊस खरेदी केला. त्याची किंमत १०९४ कोटी ३२ लाख रुपये आहे. यामध्ये शामली कारखान्याने एक कोटी १० लाख ५० हजार क्विंटल ऊस खरेदी केला. त्याचे मूल्य ३३२ कोटी ४७ लाख रुपये आहे. चालू हंगामात कारखान्याने १७.०९ टक्के म्हणजेच ५६ कोटी ८३ लाख रुपयांची ऊस बिले शेतकऱ्यांना अदा केली आहेत.
ऊन साखर कारखान्याने ३३० कोटी ११ लाख रुपये किंमतीच्या एक कोटी ५ लाख १२ हजार क्विंटल उसाची खरेदी केली. तर पूर्ण हंगामात ११८ कोटी ९९ लाख रुपये म्हणजे एकूण मूल्याच्या ३६.०५ टक्केच पैसे दिले आहेत.
ऊस विभागाच्या आकडेवारीनुसार, थानाभवन कारखान्याने एक कोटी ३६ लाख ८२ हजार क्विंटल ऊस ४३१ कोटी ७४ लाख रुपयांना खरेदी केला. हंगामात कारखान्याने ७७ कोटी ३९लाख रुपयांची, १७.९२ टक्के ऊस बिले अदा केली आहेत. जिल्ह्यातील कारखान्यांनी एकूण १०९४ कोटी ३२ लाख रुपयांपैकी २५३ कोटी २१ लाख रुपये म्हणजे २३.१४ टक्के पैसे दिले आहेत. अद्याप ८३१ कोटी ११ लाख रुपये थकीत आहेत. शेतकऱ्यांचे शामली कारखान्याकडे २७५ कोटी ६४ लाख, ऊन कारखान्याकडे २११ कोटी ११ लाख, थानाभवन कारखान्याकडे ३५४ कोटी ३६ लाख रुपये देणे अद्याप बाकी आहे.
यासंदर्भात जिल्हा ऊस अधिकारी विजय बहादूर सिंह म्हणाले, कारखान्यांवर ऊस बिले देण्यासाठी दबाव वाढवला आहे. शामली कारखान्याने ऊसाचे अनुदान आल्यावर त्वरीत बिले देण्याचे आश्वासन दिले आहे.