शाहजहांपुर, उत्तर प्रदेश: साखर कारखान्यांनी सध्याच्या गाळप हंगामाचे पैसे भागवण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी निगोही तसेच रोजा साखर कारखान्याने 33 करोड़ 80 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. पण तिलहर व पुवाया सहकारी साखर कारखाना तसेच मकसूदापूर साखर कारखान्याने सुरुवात केलेली नाही. या साखर कारखान्यांवर गेल्या वर्षाचे देय अजून बाकी आहे.
निगोही साखर कारखान्याने 5 नोव्हेंबरला गाळप हंगामाचा शुभारंभ केला होता. सोमवारी व्यवस्थापनाने 15 नोव्हेंबरपर्यंत खरेदी केलेल्या ऊसाचे मूल्य 27.20 करोड़ रुपये, 13784 शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. रोजा कारखान्यातही 5 नोव्हेंबरला ऊस गाळप सुरु झाले. व्यवस्थापनाने 10 नोव्हेंबर पर्यंत खरेदी करण्यात आलेल्या ऊसाचे 6.61 करोड़ रूपये 1324 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. रोजा कारखान्याने आतापर्यंत 17.42 लाख क्विंटल ऊस खरेदी केला आहे. तर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 75 लाख क्विंटल ऊस खरेदी करण्यात आला आहे. प्रतिदिन 2.50 लाख क्विंटल ऊस खरेदी व गाळप केले जात आहे.
ऊस थकबाकी भागवण्यात उशिर झाल्याने साखर कारखान्यांवर 37 लाख 68 हजार चे व्याज ही लावण्यात आले आहे. आतापर्यंत कोणत्याही साखर कारखान्याने शेतकऱ्यांना व्याज दिले नाही. लोकप्रतिनिधी देखील शेतकऱ्यांना व्याज मिळवे यासाठी आवाज उठवत नाहीत.