हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
कोल्हापूर : चीनी मंडी
साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीचे पैसे चौदा दिवसांच्या मुदतीत देण्याऐवजी त्याला उशीर झाल्याने कायद्यानुसार थकीत रक्कमेवर व्याज द्यावे लागणार आहे. यासाठी साखर आयुक्त कार्यालयाने हालचाली गतिमान केल्या आहेत. शिवाय, काही साखर कारखाने कमी दराने साखर विक्री करीत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्यावरही वॉच ठेवण्यात आला आहे.
राज्यात यंदाच्या गळीत हंगामात आतापर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना २० हजार ६५३ कोटी रुपये एफआपीपैकी केवळ १४ हजार ९११ कटी रुपये मिळाले आहेत. शेतकऱ्यांच्या एफआरपीची थकबाकी ५ हजार कोटी रुपयांची आहे. यासंदर्भात साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले की, आतापर्यंत राज्यातील ३० साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण एफआरपी दिली आहे.
उर्वरीत कारखान्यांपैकी बहूतांश कारखान्यांनी ८० टक्के रक्कम दिली असली तरी अनेकांची एफआरपी थकीत आहे. अशा कारखान्यांनाही एफआरपी पूर्ण करताना त्यावरील जादा झालेल्या कालावधीचे व्याज द्यावे लागेल. तर ज्यांनी पूर्ण एफआरपी दिली असेल, त्यांनी किती दिवस उशीरा बिले दिली हे पाहून त्यांना उर्वरीत कालावधीच्या रक्कमेवरील व्याज द्यावे लागेल. यासाठी कारखाने सकारात्मक आहेत. काही साखर कारखाने कमी दराने साखर विक्री करीत आहेत. काहींनी ३१०० रुपये प्रतिक्विंटल दराने साखर विक्री केल्याचे कागदोपत्री दाखविले आहे. मात्र, त्यात २०० रुपयांची तफावत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जाईल. कारखान्यांनी कायद्याप्रमाणे साखर विक्री करावी.’ साखर उद्योगालाही कर आकारणी लागू राहील असे आयुक्त गायकवाड म्हणाले.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp