साखर कारखाने २५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याची तयारी

सहारनपूर : विभागातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम २५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याची तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना ऊस लवकर पाठवून शेतकरी गव्हाची पेरणी करू शकतील. याशिवाय गळीत हंगाम वेळेवर पूर्ण होईल. विभागात गेल्या वर्षीच्या तुलनेत २.३ टक्के ऊसाचे क्षेत्रफळ वाढले आहे.

दरवर्षी साखर कारखाने नोव्हेंबरच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात सुरू होतात. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर कारखान्यांना लवकर ऊस पाठवून गव्हाची पेरणी करण्यामध्ये अडचण उभी राहते. कारखाने सुरू होण्यास उशीर होत असल्याने शेत उशीरा रिकामे होते. त्यामुळे गव्हाच्या शेतीला उशीर होऊन उत्पादन खर्च वाढतो आणि उत्पादन घटते. त्यामुळे सरकारने २५ ऑक्टोबरपासून कारखाने सुरू करण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यामुळे ऊस विभागाने कारखान्यांच्या मेटेनन्सचा आढावा घेतला आहे. ऊस उपायुक्त कार्यालयाने याचा आढावा घेतला आहे. १७ कारखान्यांमधील मिल हाऊस, बॉयलर हाऊस, पॉवर हाऊसच्या मेटेनन्सचे ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. विभागात यावेळी २.३ टक्के उसात वाढ झाली आहे. सर्व कारखान्यांकडे पुरेसा ऊस उपलब्ध असल्याचे ऊस विभागाचे उपायुक्त डॉ. दिनेश्वर मिश्र यांनी सांगितले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here