हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
ढाका : चीनीमंडी
साखरेला उठाव नसल्याने भारतातील साखर कारखाने आर्थिक अडचणीत आले आहेत. दुसरीकडे शेजारी राष्ट्रांमध्येही काही वेगळी परिस्थिती नाही. बांगलादेशामधील गैबंधा येथील रंगपूर साखर कारखान्याने त्यांच्याकडील साखरेचा साठा कमी दराने विक्रीस काढला आहे. त्यामुळे त्यांची आर्थिक तंगी संपेल, अशी आशा व्यक्त होत आहे.
रंगपूर साखर कारखान्याकडे ४ हजार ५०० टन साखरेचा साठा शिल्लक होता. या संदर्भात स्थानिक मीडियाने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. साखर कारखान्यातील कामगारांचे थकीत पगार, बिलांची थकबाकी यामुळे कारखान्याने कमी दराने का असेना, साखर विक्रीस काढण्याचा निर्णय घेतला आहे.
या संदर्भात कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक अन्वर हुसैन अकंदा यांनी बांग्लादेश साखर आणि अन्न उद्योग महामंडलाचा हवाला दिला आहे. अकंदा म्हणाले, ‘महामंडळाने सर्व सरकारी साखर कारखान्यांना साखरेची किंमत प्रति किलो पाच टकाने (बांगलादेशी चलन) कमी करण्यास अनुमती दिली आहे. देशातील वेगवेगळ्या साखर कारखान्यांमध्ये मिळून जवळपास एक लाख टन साखर पडून आहे. तिची विक्री व्हावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.’
रंगपूर साखर करखान्याकडे ११ कोटी ५० लाख टका ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकबाकी आहे. तसेच डिसेंबर २०१८ पासून कामगारांचे पगार झालेले नाहीत. त्याची जवळपास सहा कोटी टका थकीत आहेत. सरकारच्या मालकीचा हा कारखाना सध्या आर्थिक अडचणीत आहे. बांगलादेशामध्ये भारतातून आयात केलेली साखर प्रति किलो ४२ ते ४३ टका दराने विकली जात आहे. तर तेथील स्थानिक साखर कारखाने ५० टका किलो दराने साखर विकत आहेत.