बिजनौर (उत्तर प्रदेश): उत्तर प्रदेशचे ऊस मंत्री सुरेश राणा यांनी साखर कारखान्यांना आपापल्या परिसरातील गाव दत्तक घेऊन त्यांचा विकास करावा, असे सांगितले.
नहटौर च्या एका बैंक्वेट हॉलमध्ये शनिवारी स्थानिक कारखानदारांबरोबर बैठक आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, या वर्षी खरेदी केलेल्या ऊसाचे पैसे साखर विकून 14 दिवसाच्या आत भागवावेत, तसेच आपल्या परिसरातील एक – एक गाव दत्तक घेऊन त्याचा विकास करावा. या बैठकीत बिजनौर, चांदपुर, स्योहारा, धामपुर, बहादरपुर, बुंदकी, बिलाई, नजीबाबाद आणि बरकतपुर च्या साखर कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते.
राणा यांनी साखर कारखान्यांना ऊस शेतकऱ्यांची देणी लवकरात लवकर भागवावीत असे सांगितले. शिवाय ऊस शेतकऱ्यांना सर्व सुविधा मिळायला हव्या याबाबत कारखान्यांना आदेश दिले. ते म्हणाले, कारखान्याच्या केन यार्डमध्ये शेतकऱ्यांसाठी प्रकाश, पाणी, स्वच्छतागृहांची सोय केली जावी. तसेच ज्या कारखान्यांचे केन यार्ड रस्त्याजवळ आहेत, तिथे ट्रॅफीक जामची समस्या निर्माण न होण्याबाबत सूचना दिल्या.
उस मंत्र्यांनी गाव दत्तक घेण्याबाबत संबंधित गावात कारखान्यांंकडून गावांसाठी केल्या जाणाऱ्या विविध कार्याची योजना तयार करण्यााचे आदेश दिले. या गावांमध्ये कारखान्यांना सौर ऊर्जेेेपासून प्रकाश, कौशल्य प्रशिक्षण केंद्र, स्वच्छता, आरोग्य कीट अशी व्यवस्था करण्यााचेही आदेश देण्यात आले. या बैठकीला कारखाना अधिकाऱ्यांशिवाय स्थानिक आमदार, सरकारी अधिकारी आणि भाजपचे नेते बैठकीला उपस्थित होते.