साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर करावा : किसान सभा, शेकापचे आंदोलन

बीड : यंदाचा २०२४-२५ गळीत हंगाम सुरू होण्याअगोदर ऊस दर जाहीर करावा, अशी मागणी करत तालुक्यातील सादोळा येथे आज रास्ता रोको करण्यात आला. माजलगाव, वडवणी, धारूर तालुक्यांतील सर्व साखर, गूळ पावडर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दराची हमी द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. वडवणी, धारूर, माजलगाव तालुक्यातील कारखान्यांनी हंगामापूर्वी दर घोषित करावा, यासाठी अखिल भारतीय किसान सभा आणि शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनानंतर लोकनेते सुंदरलाल सोळंके सहकारी साखर कारखान्याने २०२२-२३ मधील घोषित केलेली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली. आंदोलनात माकपचे तालुका सचिव बाबा सर, किसान सभेचे अध्यक्ष कृष्णा सोळंके, शेकापचे तालुका चिटणीस लहू सोळंके, रज्जाक सय्यद, विश्वास सोळंके, अनिरुद्ध सोळंके, अशोक सोळंके, सूरज देशमुख, अरुण गरड, रमेश कचरे, गणेश कदम, युवराज कंकाळ, राजेंद्र सोळंके, अर्जुन सोळंके, विश्वंभर सोळंके आदींसह शेतकरी सहभागी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here