हरियाणातील साखर कारखान्यांनी गाळप लवकरात लवकर पूर्ण करावे:मंत्री डॉ. बनवारी लाल

पानीपत (हरियाणा) : हरियाणाचे सहकार मंत्री डॉ. बनवारी लाला यांनी प्रदेशातील साखर कारखान्यांना गाळप हंगाम लवकरात लवकर पूर्ण करावा, तसेच शेतकर्‍यांची देणीही भागवावीत, याबाबत सूचना दिली आहे.

येथील विश्रामगृहात राज्यभरातील साखर कारखान्यांच्या एमडींची बैठक रविवारी आयोजित करण्यात आली होती. यावेळी शुगर मिल फेडरेशनचे पदाधिकारीही उपस्थित होते. यावेळी मंत्री बनवारीलाल बोलत होते. मंत्र्यांनी कारखान्यांच्या पुनरावलोकन अहवालावर कारखान्याच्या संचालकांशी झालेली चर्चा, तसेच जिल्ह्यामध्ये असणारी ऊसाची उपलब्धता पाहून कारखान्यांना डायव्हर्जन सुरु करण्याचे आदेश दिले. यावर महम, गोहाना आणि फफडाना साखर कारखान्यांच्या एमडी यांनी लवकरात लवकर अतिरिक्त ऊसाची पावती काढण्याबाबत सांगितले.

मंत्री बनवारी लाल यांनी सांगितले की, डाहर गावामध्ये निर्माणाधीन साखर कारखान्याचे काम वेगात सुरु आहे. नव्या कारखान्याची ट्रायल लवकरच घेतली जाईल. त्यांनी सर्व कारखान्यांकडून शाहबाद साखर कारखान्याच्या धर्तीवर लवकर ऊस गाळप करणे आणि नवे तंत्रज्ञान वापरुन नुकसान कमी करण्याचे सुचवले.

हरियाणामध्ये शेतकरी ऊसाचा दर वाढवून देण्याची मागणी करत आहेत, ज्या मागणीला हरियाणा चे मुख्यमंत्री एम एल खट्टर यांनी फेटाळून लावले आहे. त्यांनी गुरुवारी ऊसाच्या दरात कोणत्याही प्रकारची वाढ करण्यास नामंजूरी दाखवून सांगितले की, कुठलेही मूल्य वाढवणे हे कारखान्याच्या अर्थिक स्थितीवर अवलंबून असते. पण सध्या कारखाने नुकसानीत आहेत. सध्या 340 रुपये प्रति क्विंटल ऊसाला असणारी किंमत ही देशामध्ये सर्वात अधिक आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here