साखर कारखान्यांनी तातडीने ऊस बिले द्यावीत: जिल्हा प्रशासन

सुल्तानपूर : जिल्हा प्रशासनाने परिसरातील साखर कारखान्यांना शेतकऱ्यांचे उसाचे पैसे लवकरात लवकर देण्याच्या सूचना दिल्या आहेत. गांगनौली, बुढाना, तितावी आणि थानाभवन या साखर कारखान्यांना शेतकऱ्यांची थकीत रक्कम तातडीने देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय, ऊस विभागाच्या उपायुक्तांसह विभागातील सर्व साखर कारखान्यांच्या अधिकाऱ्यांना पत्रही पाठविण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी एका शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले होते. शेतकऱ्यांच्या ऊस बिलाची थकबाकी असल्याबद्दल जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. त्यावेळी प्रशासनाच्यावतीने याबाबत लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर शनिवारी उप जिल्हाधिकारी एस. बी. सिंह यांनी ऊस विभागाच्या उप आयुक्तांना पत्र पाठवून याबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. जिल्ह्यातील साखर कारखान्यांना शेतकऱ्यांची देणी लवकर देण्यास सांगण्यात आले. खासकरून सहारनपूर येथील बजाज साखर कारखाना गांगनौली, मुजफ्फरनगरचा बुढाना साखर कारखाना, तितावी साखर कारखाना आणि थानाभवन येथील बजाज साखर कारखान्याला निर्देश देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना लवकर पैसे द्यावेत अशा सूचना देण्यात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here