मुजफ्फरनगर : डीएम सेंल्वा कुमारी जे यांनी सर्व साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींसोबत व्हर्च्युअल बैठक घेतली. ज्यामध्ये ऊस थकबाकी भागवणे, शेतकर्यांमध्ये साखर वितरण तसेच आगामी गाळप हंगामासाठी साखर कारखान्यांच्या संचलनाची तयारी आदींची समिक्षा केली.
डीएम यांनी सर्व साखर कारखान्यांना 31ऑगस्ट पर्यंत संपूर्ण ऊसाचे पैसे भागवण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व कारखाना प्रतिनिधींना इशारा दिला आहे की, जर त्यांनी 31 ऑगस्टपर्यंत थकबाकी भागवली नाही तर त्यांच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल.
भागातील साखर कारखान्यांकडून दु़रुस्तीचे कामही जवळपास 30 टक्के पूर्ण झाले आहे. सर्व साखर कारखान्यांकडून ऑक्टोबर महिन्याच्या शेवटपर्यंत साखर कारखान्यांना सुरु ठेवण्याचे आश्वासन देण्यात आले. बैठकीमध्ये डीसीओ आरडी, डॉ. अशोक कुमार, उपाध्यक्ष साखर कारखाना खतौली, सुधीर कुमार यूनिट हेड साखर कारखाना तितावी, अरविंद कुमार दिक्षित यूनिट हेड साखर कारखाना मन्सूरपूर,लोकेश कुमार युनिट हेड रोहाना, सर्वेश कुमार प्रमुख व्यवस्थापक मोरना कारखाना, एमसी शर्मा यूनिट हेड टिकौला, राज सिंह चौधरी यूनिट हेड भैसाना कारखाना तसेच पुष्कर मिश्र यूनिट हेड खाईखेडी कारखाना आदींनी सहभाग घेतला.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.