देशातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपुष्टात येण्यास सुरुवात झाली आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या (इस्मा) निवेदनानुसार देशात १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत हंगाम २०२१-२२ मध्ये गाळप सुरू केलेल्या ५१६ साखर कारखान्यांपैकी १३ कारखान्यांनी गाळप बंद केले आहे.
उत्तर प्रदेशात सध्या ११७ साखर कारखाने सुरू आहेत. तर ३ कारखान्यांनी आपले गाळप बंद केले आहे. राज्यात या कारखान्यांनी १५ फेब्रुवारीअखेर ५९.३२ लाख टन साखर उत्पादन केले आहे. तर गेल्या वर्षी याच कालावधीत १२० कारखान्यांनी ६५.१३ लाख टन साखर उत्पादन केले होते. गेल्यावर्षी ४ कारखान्यांनी १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत आपले गाळप बंद केले होते.
सद्यस्थितीत महाराष्ट्रात एकाही साखर कारखान्याने कामकाज बंद केलेले नाही. मात्र, आगामी काही दिवसांत येथील कारखानेही बंद होऊ लागतील.