बातम्या वाचू नका ऐकाही, बातम्या वाचणे झाले एकदम सोपे ,आत्ता बातम्या वाचणे आणि ऐकणे झाले एकत्रच
शिरोळ (कोल्हापूर) : चीनी मंडी
साखर कारखानदारांनी येत्या आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर एफआरपी जमा केली नाही तर, त्यांना बेड्या ठोकणार, असा इशारा राज्याचे पणन मंत्री सदाभाऊ खोत यांनी दिला.
शिरोळ तालुक्यातील बुबनाळमधील विकास कामांच्या उद् घाटन प्रसंगी ते बोलत होते. शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे आणि साखर कारखानदार यांच्यात ‘मिलीभगत’ झाली आहे, असा टोला मंत्री खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांना नाव न घेता लगावला.
मंत्री खोत म्हणाले, ‘कोल्हापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांना अडव्हान्स कमी दिला जात आहे. सातारा जिल्ह्यात साडे अकरा टक्के रिकव्हरी आहे. तेथे कारखाने २५०० रुपये अडव्हान्स देत आहे. पण, कोल्हापूर जिल्ह्यात साडे तेरा टक्के रिकव्हरी असताना २३०० रुपयेच अडव्हान्स का? ’ साखर कारखानदार आणि शेतकऱ्यांची ही मक्तेदारी मोडून काढू, असा इशारा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिला.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp