नवी दिल्ली : भारतीय हवामान विभागाने उत्तर आणि दक्षिण भारता बरोबर पूर्वोत्तर च्या अनेक भागात मोठा पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. विभागाने सांगितले की, पश्चिमी राजस्थान च्या खूप मोठ्या परिसरामध्ये मंगळवारी मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विभागाने सांगितले की, देशभरात ऑगस्ट मध्ये झालेल्या पावसाने गेल्या 44 वर्षाचे रेकॉर्ड तोडले आहे. देशात ऑगस्टमध्ये 27 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे, तर एक जून ते 31 ऑगस्टपर्यंत देशात सामान्य ते 10 टक्के अधिक पाऊस झाला आहे.
गुजरात मध्ये संततधार मुसळधार पावसामुळे नर्मदा नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. यामुळे भरुच आणि वडोदरा जिल्हयातील गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही जिल्ह्यायातील गावातून जवळपास 5 हजार लोकांना सुरक्षित स्थळी पोचवले आहे. तर मध्य प्रदेशात झालेल्या पावसामुळे महाराष्ट्राच्या विदर्भातील अनेक भागात पूर आला आहे. विदर्भातील पूरग्रस्त भंडारा आणि चंद्रपुर जिल्हयातील 3 हजार पेक्षा अधिक लोकांना सुरक्षित स्थळी पोचवले आहे.
राष्ट्रीय राजधानी दिल्ली मध्ये यमुना नदीची पाणी पातळी कमी होत आहे आणि धोका टळला आहे. उत्तर प्रदेशातील काही भागात हलका पाऊस पडला. तर राजस्थानच्या काही भागात मोठा पाऊस पडला. मध्यप्रदेश मध्ये मोठा पाऊस आणि पुरामुळे राज्यातील 14 जिल्हयात आतापर्यंत 7 लाख हेक्टर क्षेत्रामधील पीकांचे नुकसान झाले, दरम्यान मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले की, सरकार त्यांची नुकसान भरपाई देण्यासाठी हरएक प्रयत्न करेल.
हवामान विभागाने सांगितले की, पंजाब, पूर्वी राजस्थान, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्किम, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपुर, मिजोरम आणि त्रिपुरा या परिसरात मोठा पाऊस होऊ शकतो. या प्रकारे, मंगळवारी रायलसीमा (आंध्र प्रदेश), कर्नाटक च्या तटीय एवं दक्षिणी सुदूरवर्ती क्षेत्रामध्ये तमिळनाडु, पुडुचेरी, केरळ मध्येही मोठ्या पावसाची शक्यता आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.