साखर कारखान्यांना NSWS पोर्टलवर लवकर नोंदणी फॉर्म भरण्याचे आवाहन

नवी दिल्ली : साखर संचालनालयाच्यावतीने एका ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये कारखान्यांना राष्ट्रीय एक खिडकी योजना अंतर्गत (NSWS/एनएसडब्ल्यूएस) पोर्टलवर नोंदणी फॉर्म लवकरात लवकर भरण्याचा आग्रह करण्यात आला. साखर संचालनालय या क्षेत्रातील व्यापाराच्या सुलभीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी साखर क्षेत्रातील मासिक डेटा संग्रह आणि संकलन प्रणालीत सुधारणेची योजना तयार करीत आहे. NSWS गुंतवणुकदारांना त्यांच्या व्यवसायाच्या गरजेनुसार मान्यतेसाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी हे डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करुन देत आहे. सर्व राज्ये आणि केंद्रीय मंत्रालयांना मार्च २०२३ पर्यंत NSWS मध्ये पूर्णपणे एकीकृत केले जाणार आहे.

NSWS च्या कार्यकक्षेचा विस्तार वाहन स्क्रॅपिंग योजना, भारतीय फुटवेअर, चर्मोद्योग विकास कार्यक्रम, इथेनॉल मिश्रण कार्यक्रम आणि साखर कारखाना निर्यातदार अशा खास योजनांपर्यंत करण्यात आला आहे. यामध्ये केंद्र आणि राज्य सरकार अशा दोघांच्याही मंजुरीचा समावेश आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने सर्व इथेनॉल डिस्टिलरीजना (मॉलॅसिस-आधारित आणि धान्यावर आधारित) NSWS वर डिस्टिलरी नोंदणी फॉर्म भरण्याचा आग्रह केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here