हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
पुणे: राज्यात अडचणीत आलेल्या 34 साखर कारखान्यांकडे राज्य सहकारी बँकेची तब्बल 538 कोटी रुपयांची थकबाकी आहे. या रकमेची वसुली करण्यासाठी राज्य बँकेने साखर कारखाने भाडे तत्वावर देण्याचा प्रयोग सुरु केला आहे. असे 6 कारखाने भाड्याने दिले असून, त्यातून 20 कोटी रुपयांची रक्कम बँकेच्या खात्यात जमा होत आहे.
अर्थिक अनियमितता, दुष्काळ यामुळे अडचणीत सापडलेल्या कारखान्यांनी राज्य सहकारी बँकांसह इतर बँकांकडून कर्ज घेतले होते. कारखानाच बंद झाल्याने कोटी रुपयांची कर्ज खाती थकीत झाली आहेत. या कारखान्यांमध्ये रयत, उदयसिंह गायकवाड, माणगंगा, भाउसाहेब पिराजदार, शेतकरी सोनी, वसंतदादा शेतकरी किल्लारी हे कारखाने 10 ते 25 वर्षाच्या कराराने भाडेतत्वावर दिले आहेत.