बरेली : कोरोना विषाणूचा फैलाव गावांपर्यंत झाला आहे. गावांत संक्रमितांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे गावांमध्ये साखर कारखान्यांच्या मदतीने सॅनिटायझेशन मोहीम राबविली जाणार आहे. साखर कारखाना व्यवस्थापनाने पंचायत समिती विभागाला सोडियम हायपोक्लोराइड दिले आहे. कारखान्याचे कर्मचारी आणि सफाई कर्मचारी सॅनिटायझेशन मोहीम राबविणार आहेत.
बरेलीमधील साखर कारखान्यांच्या माध्यमांतून ११९३ ग्रामपंचायतींमध्ये सॅनिटायझेशन करण्यात येणार आहे. त्यांना सहकार्य करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. गुरुवारी त्याची अंमलबजावणी सुरू झाली. पंचायत राज विभागाच्या अधिकाऱ्यांनी साखर कारखाना व्यवस्थापनाशी चर्चा केली आहे. कारखान्यांकडे सोडियम हायपोक्लोयाइड हा उपपदार्थ आहे. त्याचा वापर सॅनिटायझेशनसाठी केला जातो. सद्यस्थितीत त्याची मागणी वाढली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने झालेल्या बैठकीत मशीनद्वारे सॅनिटायझेशनची चर्चा करण्यात आली. कारखान्यांना आपापल्या विभागात त्वरीत कार्यवाही करण्याची सूचना केली. साखर कारखान्यांना सीडीओंनी पत्रही पाठवले आहे.
ग्रामपंचायतींमध्ये साखर कारखान्यांच्या सहकार्याने सॅनिटायझेशन केले जाईल. त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दररोज मोहिमेचा आढावा घेतला जाईल असे जिल्हा पंचायत राज विभागाचे रिजवान अहमद यांनी सांगितले.