सोलापूर : दुष्काळामुळे जिल्ह्यात ऊसाच्या क्षेत्रात पाच लाख हेक्टरची घट झाली आहे. शिवाय सांगली, कोल्हापूरचे ऊस क्षेत्र पुरामुळे पाण्याखाली गेल्याने ऊसाचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे आगामी हंगामाचे मोठे आव्हान समोर असल्यामुळे, त्याच्या नियोजनासाठी 27 ऑगस्टला तातडीने बैठक घेण्यात येणार आहे. शिवाय 1 सप्टेंबरपासून कारखान्यांना अॅडव्हान्स ऑनलाईन गाळप परवाने देण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती साखर आयुक्तालयातील सूत्रांनी दिली.
राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळ आणि पुरामुळे ऊसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने हंगाम वेळेवर सुरु होईल, मात्र किती कारखाने चालतील अन किती दिवस चालतील, याबाबत शंका आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत साखरेच्या उत्पन्नात 350 लाख क्विंटलची घट होईल, असे सांगण्यात आले. शिवाय मंत्री समितीच्या निर्णयानंतरच गाळप परवाने दिले जात होते. पण आता राज्यातील ऊसाची स्थिती पाहता अॅडव्हान्स गाळप परवाने दिले जाणार आहेत. गाळप कधी सुरु होणार, याचा निर्णय मात्र अजून झालेला नाही.
पुण्याच्या साखर आयुक्तालयाचे सहसंचालक पांडूरंग गायकवाड म्हणाले, साखर आयुक्त साखर कारखानदारांबरोबर 27 ऑगस्टच्या बैठकीत चर्चा करणार आहेत. यावेळी पहिल्यांदाच मंत्री समितीच्या निर्णयापूर्वी गाळप परवाने देण्याचा निर्णय झाला आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.