बिजनौर: भाकियू चे युवा प्रदेश अध्यक्ष दिगंबर सिंह आणि जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह यांनी भेट घेतली. त्यांनी सांगितले की, धामपुुर, बरकातपुर, स्योहारा साखर कारखान्यांनी चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात इंडेंट कपात केली आहे. यामुळे साखर कारखाने अनेक दिवसांपासून जाम झाले आहेत. यामुळे शेतकरी आणि सामान्य जनता दोघांनाही अडचणी येत आहेत. बैठकीमध्ये कारखाना अधिकाऱ्यांनाही बोलवण्यात आले होते . बैठकीत निर्णय घेतला की, कोणताही साखर कारखाना शेतात ऊस असेपर्यंत बंद राहणार नाही. अडिशनल बॉन्ड ची पावती संपल्यानंतर साखर कारखान्यांमध्ये एका दिवसासाठी सर्वाना मुभादेउंन ऊस घेतला जाईल. बरकातपूर साखर कारखान्यांमध्ये जोपर्यंत परिस्थीती सामान्य होणार नाही तोपर्यंत कोणीही नवी ऊस पावती देणार नाही. दिगंबर सिंह यांनी सांगितले की, जोपर्यंत शेतात ऊस आहे तोपर्यत कारखाने बंद करु दिले जाणार नाहीत.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.