बरेली : लॉकडाउनमुळे अनेक मजूर इतर राज्यांमध्ये अडकलेले होते. आणि त्यांना घरी जाणे शक्य नव्हते. पण आता प्रशासनाने या मजुरांना आपापल्या घरी जाण्यासाठी सहकार्य केले आहे.
देशातील काही साखर कारखान्यांमध्ये इतर राज्यातील ऊस तोड मजूर, श्रमिक लॉकडाउनमुळे अडकून पडले होते. पण आता त्यांना आपल्या घरी जाता येणे शक्य झाले आहे. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील साखर कारखान्यात अडकलेले जम्मू काश्मिर येथील 15 मजूर मंगळवारी एका खाजगी बसने प्रशासनाच्या मदतीने आपापल्या राज्यात रवाना झाले आहेत.
स्थानिक प्रशासनाच्या अधिकार्यांनी सोंगितले की, त्यांच्या घरी जाण्याबाबत परवानगी देण्यात आली होती, जेणेकरुन ते आपल्या कुटुंबासह ईद साजरी करु शकतील.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.