हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
पुणे : चीनी मंडी
माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी ५ मार्च रोजी राज्यातील साखर कामगारांचा मेळावा होणार आहे. महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यात कामागारांच्या थकीत वेतना बरोबरच इतरही समस्या आणि मागण्यांवर सविस्तर चर्चा होणार आहे. पुण्यात मार्केट यार्ड येथे निसर्ग मंगल कार्यालयात दुपारी तीन वाजता मेळाव्याला सुरुवात होणार आहे. राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी ही माहिती दिली.
राज्यातील ऊस गाळप हंगाम आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. ऊस कामगारांचा वेतन करार पाच वर्षांसाठी झाला होता. त्याची मुदतही आता संपत आली आहे. त्यामुळे साखर कामगारांच्या दृष्टीने हा मेळावा महत्त्वाचा मानला जात आहे. राज्यात साखर कामगार संघटनेचे सुमारे एक लाख २० हजार सभासद आहेत. या सभासदांचे आता मेळव्याकडे लक्ष लागले आहे.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp