ढाका : बांगलादेशाची राजधानी ढाकामध्ये साखरेसह आटा, खाद्यतेलाचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांचे हाल होत आहेत. शहरातील ६० टक्क्यांहून अधिक किराणा दुकानांमध्ये या तिन्ही जीवनावश्यक वस्तूंची टंचाई आहे. काही दुकानांवर साखर ११५-१२५ रुपये किलो विक्री केली जात आहे. सरकारने याचा दर ९५ रुपये किलो निश्चित केला आहे.
रविवारपासून सोमवारदरम्यान शहरातील रायरबाजार, पश्चिम धान मंडी, मोहम्मदपुर आणि भुतरगोली विभागातील ६१ किराणा दुकनांची पाहणी केली असता यापैकी ३७ दुकानांमध्ये साखर, आटा आणि खाद्यतेल उपलब्ध नसल्याचे दिसले. ईस्ट रायर बाजारपेठेतील मियाजी जनरल स्टोअरचे मालक अब्दुल हक यांनी सांगितले की, डिलरनी सरकारने निश्चित केलेल्या दराने साखरेचा पुरवठा बंद केला आहे. ते म्हणाले की, ५० किलोच्या साखरेचे पोते ५,४०० टका (१८० टका किलो) च्या किमतीवर ४,३०० टकाच्या व्हाऊचरसह घेण्याची अट लादली जात आहे.
सिटी ग्रुपचे संचालक बिस्वजीत साहा यांनी सांगितले की, कारखाने आणि रिफायनरींकडून साखर, आटा, खाद्य तेलाचा पुरवठा आता सामान्य झाला आहे. डिलरना त्यांच्या मागणीनुसार उत्पादने मिळत आहेत. कारण आमची कंपनी प्रती दिन प्रत्येक वस्तूसाठी १५००-१६०० टन उपलब्ध करीत आहेत. मेघना, एस. आलम, देशबंधु आणि इतर कंपन्याही डिलरना सरकारकडून निर्धारित दरावर साहित्य पुरवठा करीत आहेत. ते म्हणाले की, कारखाने आणि रिफायनरींशिवाय सरकारी एजन्सींनी डिलर, मोठ्या किराणांच्या स्तरावरही देखरेख ठेवली पाहिजे. तरच साठेबाजी केलेल्या जीवनावश्यक वस्तूंचा शोध लागू शकेल. कन्झ्युमर असोसिएशन ऑफ बांगलादेश (सीएबी) चे उपाध्यक्ष एस. एम. नजर हुसेन यांनी सांगितले की, सरकारी एजन्सींनी गेल्या दशकभरात बेईमान व्यापाऱ्यांविरोधात ५६,००० हून अधिक कारवाया केल्या आहेत. मात्र, परिस्थिती फार कमी बदलली. बांगलादेशमध्ये साखरेची मागणी वार्षिक २२ लाख टन आहे आणि देशाची ९० ते ९५ टन मागणी आयातीच्या माध्यमातून पूर्ण केली जाते.