बातम्या वाचू नका ऐकाही, बातम्या वाचणे झाले एकदम सोपे ,आत्ता बातम्या वाचणे आणि ऐकणे झाले एकत्रच
सांगली : चीनी मंडी
आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर ठप्प झाल्यामुळे सांगली जिल्ह्यातून साखर निर्यात ठप्प झाली आहे. जिल्ह्यातील कारखान्यांतून गेल्या दोन वर्षांत केवळ १४ लाख १५ हजार क्विंटल साखरच निर्यात होऊ शकली आहे. सरकारने अनुदान देऊनही निर्यातीला फारशी चालना मिळत नसल्याचे दिसत आहे. या दोन वर्षांत १ लाख ४८ हजार टन मोलॅसिस (मळी किंवा काकवी) निर्यात झाल्याची माहिती आहे. गेल्या दोन हंगामांच्या तुलनेत यंदाचे चित्र फारसे समाधानकारक नसल्याचे स्पष्ट होत आहे.
२०१५-१६ आणि २०१६-१७ या दोन हंगामांमध्ये जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी १४ लाख १५ हजार १०८ क्विंटल साखरेची निर्यात केली होती. यंदा केंद्राने प्रतिक्विंटल उसामागे १३९ रु.४० पैशांचे निर्यात अनुदान जाहीर केले आहे. मात्र, या अनुदानाची रक्कम कारखान्यांना नाही तर, शेट शेतकऱ्यांना मिळणार म्हणून साखर कारखानदारांनी निर्यातीला फारसे महत्त्व दिले नसल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर बँकांककडे असलेल्या तारण साखरेमुळेही निर्यात खोळंबली आहे.
२०१५-१६च्या हंगामात जिल्ह्यातील सहकारी आणि खासगी कारखान्यांनी मिळून ७९ लाख टन उसाचे गाळप करताना ९६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले होते. जिल्ह्यातील कारखान्यांनी ११ लाख क्विंटल साखरेची निर्यात केली. त्यानंतर पुढच्या हंगामात मात्र ही निर्यात मोठ्या प्रमाणावर खाली आली. उत्पादन कमी झाल्याचाही तो परिणाम होता. २०१६-१७च्या गळीत हंगामात जिल्ह्यातील सहकारी आणि खासगी कारखान्यांनी मिळून अवघे ५० लाख ३४ हजार टन उसाचे गाळप करताना ६० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले होते. त्यामुळे जेमतेम २ लाख क्विंटल साखरेची निर्यात केली होती.
दरम्यान, २०१५-१६च्या हंगामात जिल्ह्यातून ९१ हजार टन मोलॅसिसची निर्यात झाली होती. मात्र, सन २०१६-१७च्या हंगामात हे प्रमाण कमी झाले. त्यावेळी केवळ ५६ हजार टन मोलॅसिस निर्यात झाले. मात्र ‘हुतात्मा’ने तब्बल 24 हजार टन मोलॅसिस निर्यात करुन जिल्ह्यात आघाडी घेतली होती.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp