ढाका : ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ बांग्लादेशने (टीसीबी) रमजान महिन्यापूर्वीच खुल्या बाजारपेठेत साखरेच्या दरात वाढ केली आहे. ढाका, चटोग्रामसह देशातील इतर भागामध्ये टीसीबीच्या वाहनातून प्रती किलो टीके५५ ला साखर विक्री सुरू केली आहे. ग्राहकांना आधीच्या तुलनेत १० टक्के जादा पैसे द्यावे लागत आहेत.
टीसीबीचे प्रवक्ते हुमायूँ कबीर यांनी बाजारातील दर आणि आमच्या साखर विक्रीची किंमत यांदरम्यानचे अंतर कमी करण्यासाठी साखरेची दरवाढ केल्याचे सांगितले. ३१ मार्च अखेर टीसीबीने साखर प्रती किलोग्राम टीके ५० या दराने विक्री सुरू ठेवली होती.