नायजेरियाने मालाची ने-आण करण्यासाठी आपल्या देशाच्या सीमा पूर्णपणे बंद केल्या आहेत. शिवाय त्यांना पुन्हा खुल्या करण्यासाठी कुठलीही वेळ निश्चित केलेली नाही. देशाचे सीमा शुल्क एजन्सीच्या प्रमुखांनी 14 ऑक्टोबर ला ही घोषणा केली. तस्करीला नियंत्रण घालण्याच्या दृष्टीने हे पाउल उचलण्यात आले आहे. यामुळे नायजेरियातील ग्राहकांना विविध खाद्यपदार्थ म्हणजेच साखर, अधिक महाग होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
नायजेरिया सीमा शुल्क सेवा महाप्रबंधक हमीद अली म्हणाले, आता सर्वच वस्तुंना आमच्या सीमेवरुन ने-आण करण्यावर निर्बंध आहेत. सीमा बंद असूनही, सामानासाठी विशेष स्कॅनरला पार करुन जाणे गरजेचे आहे, पण ते स्थान कुठे आहे याबाबत मौन आहे. अली म्हणाले, सीमांना खुले करणे शेजारील राज्यांच्या कारवाईवर अवलंबून राहील. जोपर्यंत ती राज्ये आणि नायजेरिया या गोष्टीवर सहमत होत नाहीत, कुठल्या मालाची आयात किंवा निर्यात केली गेली पाहिजे. तोपर्यंत सीमारेषा बंद राहिल.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.