बांगलादेशमध्ये रशिया-युक्रेन युद्धानंतर साखरेच्या किमतीत ६० टक्क्यांची वाढ : रिपोर्ट

ढाका : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे बांगलादेशात साखरेच्या किमतीत ६० टक्क्यांची वाढ झाली आहे, असे आंतरराष्ट्रीय मानवतावादी संघटना ॲक्शन एडने (international humanitarian organisation ActionAid) केलेल्या एका अभ्यासात दिसून आले आहे. या अभ्यासानुसार बांगलादेशमध्ये पेट्रोलच्या दरात ४७ टक्के वाढ झाली आहे. अहवालात म्हटले आहे की बांगलादेशात राहण्याचा खर्च वाढला आहे. त्याचा उपेक्षित समाजावर विपरित परिणाम झाला आहे.

अभ्यासात म्हटले आहे की, दरवाढीमुळे सर्वसामान्य लोकांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. ते शिक्षण, आरोग्य, पोषण अशा दैनंदिन घटकांशी लढत आहेत. ॲक्शनएडच्या अहवालात म्हटले आहे की, बांगलादेश सद्यस्थितीत हवामान बदल, रशिया-युक्रेन युद्ध, कोविड १९, कर्जामुळे येणारा ताण, चलनाचे अवमूल्यन अशा अनेक संकटांना तोंड देत आहे.
अॅक्शनएडचे बांगलादेशचे संचालक फराह कबीर यांनी सांगितले की, इंधनाच्या किमतीमधील अस्थिरतेचा परिणाम विविध क्षेत्रांवर झाला आहे. यातून महिला आणि आर्थिक दुर्बल घटकांवर विपरित परिणाम झाला आहे. सर्व्हेत अफगाणिस्तान, बांगलादेश, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो (डीआरसी), इथियोपिया, हैती, केनिया, मलावी, म्यानमार, नेपाळ, नायजेरिया, सिएरा लियोन, सोमालीलँड, झांबिया आणि झिंम्बाब्वे यांचा समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here