ऑक्टोबरपासून सुरु होणार्या हंगामात जागतिक बाजारपेठेत साखरेच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. भारत, थायलंड, युरोपियन युनियन या देशातील साखरेच्या उत्पादनात 4 मिलियन टन घट झाल्यामुळे, किमती वाढण्याची शक्यता असल्याचे इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे (इस्मा) अविनाश वर्मा यांनी सांगितले. ते म्हणाले, भारताच्या साखर सबसिडीबाबत ब्राझिलसह काही देशांनी आक्षेप घेतला आहे. त्यानुसार जागतिक व्यापारी संघटनेला पॅनेल स्थापण्याची विनंतीही करण्यात आली.
त्यानुसार दक्षिण अमेरिकेत जेनेवा-आधारित जागतिक व्यापारी संघटनेने पॅनेल स्थापन करण्यासंदर्भात निवेदनही दिले होते.
या विवाद पॅनेलवरुन भारताची सबसिडी जागतिक व्यापारी संघटनेच्या नियमांशी सुसंगत आहे की नाही याबाबत चर्चा करता येईल. संघटनेने मंजूर तरतुदींमधून निर्यातीस पाठबळ देण्याचाही प्रयत्न करता येईल.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.