इस्लामाबाद: बाजारामध्ये नवी साखर आल्यानंतर लगेचच, साखरेच्या किमतींमध्ये प्रति किलो जवळपास 20-23 रुपयांची घट आली आहे. खुल्या बाजारात साखर सरासरी प्रति किलो कमीत कमी 80 रुपयांवर विकली जात आहे. ग्राहकांचे म्हणणे आहे की, साखरेच्या किेंमतीमध्ये घट झाल्याने खूपच दिलासा मिळाला आहे, आता सरकारला इतर वस्तुंच्या किंमतीही कमी करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. गेल्या दोन महिन्यांपासून, काही शहरांमध्ये साखरेच्या किमतींमध्ये प्रति किलो 11 रुपयापेक्षा अधिक वाढ दिसून आली होती, पण वेळेवर उसाचे गाळप आणि खुल्या बाजारात स्थानिक साखरेच्या आगमनामुळे किमती कमी होत आहेत.
ऑल पाकिस्तान ट्रेडर्स असोसिएशन चे अध्यक्ष अजमल बलुच यांनी सांगितले की, साखरेचे सरासरी विक्री मूल्य रु. 80 प्रति किलो पर्यंत कमी झाले आहे, तर पहिल्यांदा 90 रुपये प्रति किलो विक्री होत होती. त्यांनी सांगितले की, आता उसाचे गाळप सुरु आहे आणि जसजशी नव्या साखरेची आावक सुरु झाली आहे, साखरेच्या किमती गतीने कमी होत आहेत. बलूच यांनी सांगितले की, सिंध आणि पंजाब मध्ये साखरेच्या पूर्वीच्या किमती आता 78 रुपये प्रति किलो आहेत.