फिलिपाईन्समध्ये साखरेच्या दरात घसरण

मनिला : कृषी विभागाने(डीए)दिलेल्या माहितीनुसार, रिफाइंड साखरेची किरकोळ किंमत P8 प्रती किलोने घटून प्रती किलो P92 झाली आहे. मेट्रो मनिला मार्केट्सच्या डीएच्या निरीक्षणाच्या आधारावर, साखरेच्या किमती 6 जून रोजी P74 आणि P100 च्या तुलनेत आता P७४ आणि P92 प्रती किलो यांदरम्यान राहिल्या आहेत.

दरम्यान, फिलिपाइन्स शुगर मिलर्स असोसिएशनच्या (पीएसएमए)च्या साखर आयात करण्याची गरज नसल्याच्या भूमिकेला साखर उत्पादकांनी पाठिंबा दिला आहे.त्यांनी सांगितले की, फिलिपाईन्समध्ये पीक वर्षाच्या शेवटपर्यंत स्थानिक साखरेचा पुरेसा साठा असेल.

साखर परिषदेचे प्रवक्ते राफेल कोस्कालुएला यांच्या म्हणण्यानुसार,पीएसएमए सदस्य कारखान्यांनी उत्पादित केलेल्या एकत्रित साखरेचे प्रमाण 65 टक्क्यांहून अधिक झाले आहे.साखर परिषद ही तीन ऊस उत्पादक संघांची (ऊस उत्पादक संघटना, ऊस उत्पादकांची राष्ट्रीय संघटना आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पानाय संघटना) यांची आघाडी आहे.देशाच्या साखर उत्पादनात परिषदेचा वाटा 67 टक्के आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here