भारताच्या निर्यात निर्बंधांमुळे बांगलादेशात साखरेच्या दरात वाढ

ढाका : रशिया-युक्रेन युद्धामुळे आधीच बांगलादेशमधील ग्राहकांना खाद्य तेल, गहू, तांदूळ यांच्या दरवाढीचा आणि देशांतर्गत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. आता साखर निर्यात मर्यादीत करण्याच्या भारताच्या निर्णयामुळे बांगलादेशात साखरेच्या दरात वाढ सुरू झाली आहे. आगामी काही काळत पुरवठा कमी होण्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. भारताने निर्यातीवर मर्यादा लागू करतान म्हटले आहे की, आपल्या देशांतर्गत बाजारातील उपलब्धता आणि दर स्थिरता आणण्यासाठी या हंगामात १०० लाख टन साखर निर्यातीस अनुमती दिली जाईल.

श्रीलंका, इंडोनेशिया, अफगाणिस्तान आणि संयुक्त अरब अमिरातीबरोबरच बांगलादेश हा भारताचा प्रमुख खरेदीदार देश आहे. बांगलादेश साखरेच्या आयातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे.

Trading Corporation of Bangladeshने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या एक वर्षात साखरेच्या दरात ७ टक्क्यांची वाढ झाली आहे. डिलर्सकडून पुरवठा कमी झाल्याने गेल्या काही दिवसात ढाका आणि चट्टोग्राम येथील बाजारात घाऊक किमतीत Tk50 ते Tk60 प्रती maund (जवळपास ३७ किलो) वाढ झाली आहे. व्यापाऱ्यांनी सांगितले की, देशातील सर्वात मोठा कमोडिटी मार्केट चट्टोग्राममध्ये खातुनगंज घाऊक बाजारातील किमती Tk 2,835 रुपयांपासून Tk 2,850 रुपये प्रती maund पर्यंत पोहोचल्या आहेत. तीन दिवसांपूर्वी या किमती Tk 2,770 ते Tk 2,780 होत्या. ढाका आणि चट्टोग्राम येथील काही किरकोळ दुकानावरही किमती Tk 2 ते Tk 5 प्रती किलोग्रॅम वाढून Tk 85 ते Tk 90 पर्यंत पोहोचल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here