हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मते साखर उद्योगाला संकटातून बाहेर काढायचे असेल तर पारंपरिक साखर उत्पादन न करता आता इथेनॉल उत्पादन करने काळाची गरज आहे.
गडकरी म्हणाले, साखरेचे मोठे उत्पादन पाहता, साखरेला चांगली किंमत मिळण्याची शक्यता अशक्य आहे. म्हणून आता साखर कारखान्यांनी साखरेचे उत्पादन कमी करून इथेनॉल आणि अल्कोहोल चे उत्पादन वाढवावे. सादर प्रयोड हा किसान वीर सहकारी साखर कारखान्याने केल्यामुळे त्यांची प्रशंसा देखील केली.
किसान वीर कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीचे अध्यक्ष मदन भोसले, नितीन गडकरी यांना भेटले आणि राज्यातील साखर उद्योग आणि दुष्काळी परिस्थितीशी संबंधित विविध विषयांवर चर्चा केली तसेच दहा वर्षापूर्वी फॅक्टरीने बी हेवी मोलॅसीस, इथेनॉलवर केलेल्या प्रयोगाबद्दल माहिती दिली, हा देशातील प्रथम प्रयोग असल्याचे त्यांनी सांगितले.
इथेनॉल उत्पादन सोबत अल्कोहोल उत्पादनाकडे जाण्याची मागणी करत गडकरी म्हणाले, भविष्यात इथेनॉलचा वापर वाढेल आणि यामुळे शेतकर्यांना निश्चितच फायदा होईल. उसाच्या रसा पासून अल्कोहोल उत्पादन अनेक ठिकाणी यशस्वी झाले आहे. नवीन साखर कारखाने तयार करणे ही बाब हिताची नाही हे आवर्जून त्यांनी सांगितले