पाकिस्तानमध्ये सरकारी निर्बंधांनंतरही साखरेच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये एप्रिलच्या मध्यावर ९८ रुपय किलो असलेल्या साखरेच्या दरात आता ६० टक्के वाढ होवून ती १६० रुपये किलोने विकली जात आहे. सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेलेल्या साखरेचे दर रोखण्याच्या प्रयत्नांनंतरही पुन्हा दरवाढीची शक्यता आहे. साखरेचे दर रोखण्यासाठी सरकार अॅक्शन मोडवर आली आहे. मात्र, साखरेचे दर गेल्या तीन महिन्यांपासून वाढतच आहेत. दोन्ही घटक या साखरेच्या दरवाढीसाठी वेगवेगळ्या कारणांनी जबाबदार ठरवत होते.

अलिकडेच पंजाब सरकारने अन्न सामग्री आदेश २०२३ लागू केला आहे. यामध्ये जिल्हा प्रशासनाला साखरेचा साठा कारखान्यांकडून उचलण्यासाठी अधिकृत करण्यात आले आहे. बाजारातल्या किमती स्थिर करण्यासाठी पुरवठा केला जाईल. प्रशासन साखर कारखानदार आणि डिलर्सविरोधात खटलाही दाखल करू शकतील आणि तीन वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. अहवालानुसार, जवळपास डझनभर साखर कारखान्यांकडे आतापर्यंत ०.२ मिलियन टन साखर आहे. त्यांना पंधरा दिवसांपेक्षा अधिक काळ ती आपल्याजवळ ठेवता येणार नाही.

साखर सल्लागार बोर्डाच्या माध्यमातून सरकारच्या मंजुरीशिवाय साखरेच्या किमतीत वाढ केली जाऊ शकत नाही. मात्र, साखर कारखान्यांनी २५ बिलियन रुपयांपर्यंत अवैध नफा कमावला आहे असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि संशोधन मंत्र्यांनी सिनेट स्थायी समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत सरकारला दिलेल्या निर्यातीच्या आकड्यांमध्ये कारखान्यांनी फसवणूक केल्याचा आरोप केला. याबाबत पाकिस्तान शुगर मिल्स असोसिएशन (पीएसएमए) चे प्रवक्ते टिप्पणीसाठी उपलब्ध नव्हते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here