ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ पाकिस्तानने (टीसीपी) ने गहू आणि साखरेच्या आयातीसाठी पुन्हा एकदा निविदा जारी केल्या आहेत. त्यामुळे रमजानच्या कालावधीत देशातील नागरिकांना या जीवनावश्यक वस्तूंच्या तुटवड्याचा सामना करावा लागेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रसार माध्यमांतील वृत्तांनुसार, महागड्या बोलीमुळे ५०००० मेट्रीक टन साखरेचे आधीचे टेंडर रद्द करण्यात आले आहे. ही निविदा पुन्हा प्रसिद्ध करण्यात आली आहे.
पाकिस्तानातील युटीलीटी स्टोअर्ससाठी साखर आयात केली जात आहे. देशातील सर्वात जास्त लोकसंख्येला स्टोअर्सकडून गरजेच्या वस्तूंचा पुरवठा केला जातो. सद्यस्थितीत ग्राहक केंद्रांमध्ये साखर ६९ रुपये किलो दराने उपलब्ध आहे.
यापूर्वी पाकिस्तान शुगर मिल्स असोसिएशनने (पीएसएमए) सांगितले होते की, उसाच्या दरात वाढ झाल्यामुळे साखरेचे दर ९८ रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.