कमॉडिटि मार्केटमध्ये सॉफ्ट कमॉडिटिजना एका पाठोपाठ एका धक्क्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यात साखरेच्या किमतींनी चिंता वाढवली असली, तरी काही व्यापाऱ्यांच्या अंदाजानुसार साखरेचे दर याहीपेक्षा खाली उतरण्याचीशक्यता आहे. विशेष म्हणजे कॉफी आणि साखरेचे स्टॉक बाजारावर दबाव टाकत असताना, ब्राझीलसारख्या विकसनशील देशांमध्ये सुरू असलेल्या आर्थिक घडामोडींमुळे तेथील पुरवठादारही माल पुरवण्यात उत्सुक नाहीत.
दरम्यान, टर्कीच्या आर्थिक संकटामुळे मार्केटमधील मोठ्या कापूस मागणीला मर्यादा येऊ लागल्या आहेत. त्याचवेळी अमेरिकीत अधिक उत्पादनाची शक्यता वाढू लागली आहे. तीन कमॉडिटिमध्ये चांगले रिटर्न्स देणाऱ्या दीब्लूमबर्ग सॉफ्टस् सबइंडेक्सने गेल्या शुक्रवारी विक्रमी निचांक अनुभवला आहे. दुसरीकडे न्यूयॉर्कच्या बाजारात कच्च्या साखरेचा भाव या दशकातील निच्चांकी पातळीवर होता. तर कॉफी आणि कापसालाही या आठवड्यातनुकसानीला सामोरे जावे लागले आहे.
या संदर्भात आयएनटीएल एफसी स्टोनच्या रिस्क मॅनेजमेंट कन्सल्टंट ज्युलीओ सेरा यांनी एक मुलाखत दिली आहे. टर्कीमधील आर्थिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सेरा म्हणाले, ‘एकमेंकांच्या अर्थव्यवस्थेवर असलेल्याअवलंबित्वामुळे विकसनशील देशांमधील अर्थव्यवस्थांमध्ये वादळ निर्माण झाल्याचे दिसत आहे. त्याचा सर्वाधिक परिणाम कृषी उत्पन्नावर होताना दिसत आहे. ब्राझील आणि कंबोडियाच्या चलनाचा दर घसरला आहे. त्यामुळे त्यादोन्ही देशांमध्ये कृषी मालाच्या उत्पादकांना विक्रीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. जेणेकरून अधिक अधिक डॉलर मिळवता येतील. ब्राझील हा साखर आणि कॉफीचा जगातील सर्वांत मोठा निर्यातदार आहे. तर अरेबिकाकॉफीच्या बियांच्या निर्यातीत कंबोडियाचा जगात दुसरा क्रमांक लागतो.’
अमेरिकेत कच्च्या साखरेचे दर १.८ टक्क्यांनी घसरले असून प्रति पाऊंड १०.११ सेंटस् असा दर झाला आहे. जून २००८नंतरचा हा सर्वांत निचांकी दर आहे. जगातील आर्थिक स्थिती अशीच राहिली, तर किमती आठ सेंटसपर्यंतघसरण्याचा धोका आहे, अशी शक्यता न्यूयॉर्कमधील निकजेन कॅपिटल मॅनेजमेंट संस्थेचे मॅनेजिंग पार्टनर निक जेंटल यांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वी २००४मध्ये साखर या निचांकी दराला पोहोचली होती, असा संदर्भही त्यांनी दिला.
जेंटल म्हणाले, ‘ब्राझीलच्या बाजारपेठेला बसलेल्या फटक्यामध्ये उत्पादकांना संधी आहे. डॉलरमध्ये होणाऱ्या व्यवहारांमध्ये विक्री करून ते किमतीशी जुळवून घेऊ शकतात. ते उत्पादक या परिस्थितीतही पैसे मिळवून शकतात.यात धोका हा आहे की, बाजारात अजूनही बरी परिस्थिती असल्यामुळे विक्रेत्यांसाठी ते अनुकूल आहे. त्यामुळे ते कोठेही जाणार नाहीत. त्याचबरोबर साखरेच्या खरेदीदारांनाही दर आणखी घसरावेत, असे वाटत आहे. ’
जगात साखरेचा पुरवठा सर्वाधिक झाल्यामुळे आणि गेल्या दहा वर्षांतील सर्वांत कमी दर मिळू लागल्यामुळे साखरेचा ब्राझील दबदबा कमी होण्याचा अंदाज आहे. येत्या काही आठवड्यांत ब्राझीलमधील बंदरांमध्ये दहा लाख मेट्रिकटन साखर जहाजांमध्ये चढवली जाणार आहे. शिपिंग एजन्सी विल्यम्सच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी केलेल्या नियोजनानुसार हा केवळ निम्मा स्टॉक आहे आणि २००८नंतर ऑगस्ट दरम्यानचा ही सर्वांत निचांकी स्टॉक आहे.एप्रिलपासून सुरू झालेल्या हांगामात मागणी खूप घटली आहे. ब्राझीलच्या व्यापार मंत्रालयाच्या आकड्यांनुसार जुलैमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत होणारी निर्यात २४ टक्क्यांनी घटली आहे.
सुकडेनच्या ब्राझील युनिटचे संचालक जर्मे जॉन ऑस्टिन यांच्या म्हणण्यानुसार, साखरेच्या मोठ्या ग्राहकांनी यापूर्वीच साखरेची खरेदी करून ठेवली आहे. आता पुन्हा साखर खरेदी करून ठेवण्यासाठी ते दर उतरण्याची अपेक्षाकरत आहेत.